27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसोयाबीन पट्यात प्रथमच २० हेक्टरवर केळी लागवड

सोयाबीन पट्यात प्रथमच २० हेक्टरवर केळी लागवड

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे अर्थचक्र दरवर्षी बिघडत आहे. त्यामुळे तालुक्यातील धामनगाव परिसरातील काही शेतक-यांंनी यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या पट्यात पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी सुरू केली आहे. यंदा प्रथमच २० हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड झाली असून या केळी लागवडीमुळे तालुक्यातील घरणी प्रकल्पाशेजारी ऊस व सोयाबीन ऐवजी केळी शेती बहरणार आहे.
    शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहेत मात्र सोयाबीन लागवड व उत्पादनातील कमालीची तफावत शिवाय मिळणारा अल्पदर यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे अर्थचक्र दरवर्षी बिघडत आहे. त्यामुळे तालुक्यात ऊस बेल्ट म्हणून ओळखला जाणारा धामणगाव परिसरात ऊस व सोयाबीन या पारंपारिक पिकांना फाटा देऊन आधुनिक शेतीची कास धरत काही शेतक-यांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच केळी लागवड केली आहे.
दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यात दरवर्षी विक्रमी सोयाबीन उत्पादन होते. सोयाबीन पिकांतही अनेक शेतक-यानी नवनवीन बियाण्यांचा वापर करून जादा उत्पादनाची कास धरली मात्र, सोयाबीनचा प्रतिकिं्वटल दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे केवळ पारंपरिक सोयाबीनची शेती शेतक-यांना आर्थिक उभारी देऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन धामणगाव येथील चंद्रकांत कोरे, अंगद बोळंगे,भरत शिंंदे,अशोक बोळंगे,संजय माळी, मुरलीधर भोसले, दत्ता बोळंगे, विरभद्र बोळंगे, प्रभाकर कोरे या शेतक-यांंना यंदा केळी लागवडीला पसंती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR