29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeसोलापूरसोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांच्या नेतृ त्वाखाली जल्लोष

सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांच्या नेतृ त्वाखाली जल्लोष

सोलापूर—
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालय येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यां समवेत गुलालाची मुक्त उधळण करत हलगयाच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, जेष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, प्रशांत जाखलेकर, मौल्ला पटेल, श्रीनिवास गायकवाड, किरण शिंदे, अमोल जगताप, रमेज मुल्ला,ऋषभ प्याटी, फारूख बागवान, उत्कर्ष गायकवाड, ओंकार जाधव, आदिल जाधव, उमेश जाधव,‌ दर्याप्पा पुजारी, दिनेश आवटे, सोनू पटेल, हुल्लगाप्पा शासम, ऋषी येवले, जयेश कँडी जाधव, तेजस गायकवाड, गणेश याळगी, शितल क्षिरसागर, माणिक कांबळे, महादेव राठोड, रवी सराटे, श्रीकांत घोडके, आमोल कोळी, सिकंदर शेख, शुशात वाघमारे, शिवाजी चाबुकस्वार आदीसह राष्ट्रवादी पक्षाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

किसन जाधव म्हणाले, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकाससाठी आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्य करू, घड्याळ तेच वेळ नवी या वेळेनुसार आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात कार्य करू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR