16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरस्कूल संसद स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

स्कूल संसद स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर : प्रतिनिधी
पुणे येथे आयोजित ‘स्कुल संसद’ या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी २४६ शाळांमधून उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अद्वितीय यशाबद्दल सहभागी टीमच्या मार्गदर्शिका सौ.अनिता यलमटे व सहभागी विद्यार्थिनी पंतप्रधान सायली कुलकर्णी, खासदार भक्ती पटणे, खासदार अक्षरा दुरुगकर यांचा इच्छापूर्तीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इच्छापूर्तीचे मार्गदर्शक गुंडप्पा पटणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह शंकरराव लासूने, लालबहादूर शास्त्रीचे उपमुख्याध्यापक संजयराव कुलकर्णी, क्लासेसच्या मार्गदर्शिका नागीणबाई पटणे, लालबहादूर शाळेच्या सहशिक्षिका व विजेत्यांच्या मातोश्री प्रिती दुरुगकर, प्राजक्ता जोशी व संगीता पटणे सत्कारमूर्ती आदर्श व उपक्रमशीला शिक्षीका अनिता यलमटे यांची उपस्थिती होती. क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्या हस्ते विजेत्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायली कुलकर्णी, भक्ती पटणे व अक्षरा दुरुगकर यांनी या स्पर्धेत त्यांना आलेले अनुभव सांगून या स्पर्धेत आम्हाला खूप कांही शिकायला मिळालं, सभागृहत बसलो असताना आम्हाला आम्ही खरच खासदार, पंतप्रधान असल्यासारखं वाटत होत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी शंकरराव लासूने, संजयराव कुलकर्णी यांची यथोचित भाषणे झाली. यावेळी सत्कार समारंभ ठेवल्याबद्दल संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांचे आभार मानले. यानंतर सुप्रसीद्ध कवयित्री व लेखिका विजेत्यांच्या मार्गदर्शिका अनिता यलमटे यांनी अनुभव सांगत मार्गदर्शन केले. यावेळी प्रिती दुरुगकर यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप गुंडप्पा पटणे यांनी केला. प्रास्ताविक प्रा. सिद्धेश्वर पटणे, सूत्रसंचलन प्रा.संजय जामकर तर आभारप्रदर्शन प्रा.अशरफ खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.ज्ञानेश्वर केंद्रे, प्रा.श्रद्धा चंदे, प्रा.कावेरी नळगिरे, प्रा.वर्षा जावरे, प्रा.तरगुडे मॅडम, चंद्रकांत काटवटे, वेदांत चिमेगावे, गजानन जावरे, अरुण कांबळे, माधव तोंडारे, सुमित मुळे आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR