26.7 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयस्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; दिल्लीत दुतावासाची मागणी

स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; दिल्लीत दुतावासाची मागणी

कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरातमध्ये हल्ले केले. मात्र हे हल्ले परतवून लावल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या विरोधात भारतासह बलुचिस्तानने देखील हल्लाबोल केला.

पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि कराची अशी महत्त्वाच्या शहरांवर भारताने हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. मात्र पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे भारताने देखील आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पाकिस्तानला त्याची युद्धाची खुमखुमी मोठी महाग पडणार आहे. भारतानंतर बलुचिस्तानने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना बलुच लेखक मीर यार बलोच यांनी मोठी घोषणा केली. सोशल मीडिया ‘एक्स’वर त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे शांती पथक पाठवण्याची विनंती करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमधील अनेक शहर आणि परिसरावर कधीचाच ताबा मिळवला आहे. याभागातील शाळा, महाविद्यालये, सरकारी आस्थापनातील पाकिस्तानी झेंडे फेकून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे येथे पाकिस्तानी राष्ट्रगीताला बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR