27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रहडपसरमध्ये अजित पवार गटाला धक्का; ५ माजी नगरसेवकसाथ सोडणार

हडपसरमध्ये अजित पवार गटाला धक्का; ५ माजी नगरसेवकसाथ सोडणार

हडपसर : प्रतिनिधी
पुण्याच्या हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून, हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. आनंद अलकुंटे हे माजी नगरसेवक असून, ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तसेच त्यांनी पीएमपीएलचे माजी संचालक म्हणूनही काम केले आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात आनंद अलकुंटे निवडणूक लढवणार आहेत.

हडपसरमधून अजित पवार समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह रामटेकडी व कोंढवा येथील अजून दोन माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत, तर मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR