हर्सूल तलावात बुडून चौघे ठार

पोहण्यासाठी गेले होते तरुण, दोघांची ओळख पटली
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
उन्हाळ््यामुळे सध्या अंगाची लाही लाही होत असून उन्हाळी सुटीत पोहण्यासाठी विहीर, तलाव किंवा नदी पात्रात तरुणाईसह वडीलधारी मंडळीही जात असतात. परंतु धक्कादायक म्हणजे छ. संभाजीनगर शहरालगत असलेल्या हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ४ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

हर्सुल तलावात तरुण मुले बुडाल्याची आणि सुरुवातीला ३ तरुण तलावात बुडाल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाच्या मदतीने बचावकार्य करत तिघांचे मृतदेह तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, तलावाच्या दुस-या बाजूला आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने तेथेही शोधमोहीम राबवली. त्यावेळी चौथ्या तरुणाचा मृतदेह पाण्यात आढळून आला.

रविवारची सुटी असल्याने हे सर्व तरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा रविवार त्यांच्या आयुष्यात शेवटचा ठरल्याची दु:खद घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तलावात बुडालेल्या चौघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news