हळद उत्पादक शेतकरी आक्रमक; लिलाव बंद पाडत केले ठिय्या आंदोलन

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतक-यांचा संताप अखेर उफाळून आला आहे. विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतक-यांनी मंगळवारी २८ रोजी हळदीचा लिलाव (बिट) बंद पाडत ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनकर्त्या शेतक-यांचे म्हणणे आहे की, हळदीच्या लिलावात एकाच दर्जाच्या मालाला तब्बल ६ हजार ते ७ हजारांपर्यंत दरातील तफावत दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नसून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतक-यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, माल विक्रीनंतर पैसे मिळण्यासाठी सुमारे ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शेतीसाठी खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि इतर खर्चासाठी तातडीने पैशांची गरज असताना इतका विलंब होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. याशिवाय, ज्यांना तातडीने पैशांची आवश्यकता असते, अशा शेतक-यांना ३ टक्के बिल्टी कपात करून रक्कम दिली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांची अशा प्रकारे पिळवणूक होत असल्याचा आरोप करत ही पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

बाजार समितीतील मूलभूत सुविधांबाबतही शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दूरवरून माल घेऊन येणा-या शेतक-यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तसेच ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांसाठी पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news