18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeलातूरहातभट्टी दारू अड्ड्यांवर छापेमारी; ४ गुन्हे दाखल

हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापेमारी; ४ गुन्हे दाखल

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत दि. २३ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील विविध ठिकाणी लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणा-या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली. हातभट्टी दारु बनवणा-या अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली. चार व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR