22.1 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeपरभणीहिंदी परीक्षेत १५० विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य

हिंदी परीक्षेत १५० विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य

जिंतूर : महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजित केलेल्या हिंदी परीक्षेमध्ये बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल माथला जिंतूर येथील वर्ग १ली ते १०वी मधून एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. यामध्ये शाळेतील ३ विद्यार्थिनींना राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

वर्ग ३री मधून रुत्वा मयूर कोकडवार, वर्ग ६ वी मधून आराध्या सचिन कडे आणि वर्ग ९ वी मधून आर्या किरण रेघाटे या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या संचालिका सौ .भावनाताई बोर्डीकर (मुंगसे), प्राचार्या श्रीमती अनन्या पॉल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. या परीक्षेसाठी शाळेतील हिंदी विभागाचे प्रमुख अमोल घुगे तसेच हिंदी विषय शिक्षिका स्नेहल उखळकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR