25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयहिसारमध्ये सासरा विरुध्द सून अशी लढत

हिसारमध्ये सासरा विरुध्द सून अशी लढत

हिसार : हिसार लोकसभा मतदारसंघातील राजकीय मूडही यावेळी शिगेला पोहोचला आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह चौटाला यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील नैना चौटाला आणि सुनैना चौटाला या दोन सुना वेगवेगळ्या राजकीय पक्षांतून लढत आहेत.

काँग्रेसने हिसारमधून माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश जे. पी. यांना संधी देत ही लढत रंजक बनवली आहे.

जनता दलाच्या तिकिटावर जे. पी. यांनी १९८९ मध्ये हिसारमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने हिसार लोकसभा मतदारसंघातून महिलेला तिकिट दिलेले नाही. ५७ वर्षांच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघातून दोन महिला कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR