29.2 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रहीना गावितांची भाजपला सोडचिठ्ठी

हीना गावितांची भाजपला सोडचिठ्ठी

नंदुरबार : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अनेक नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. असे असताना आता ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण, राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपमधून बाहेर पडत त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डॉ. गावित इच्छुक होत्या. मात्र, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच, त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामाही पक्षाकडे दिला आहे. डॉ. गावित यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

रघुवंशी -गावित विळ्या-भोपळ्याचे नाते
शिवसेनेचे नेते, माजी आमदार पक्षाचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी आणि भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटत असतात. लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही हा वाद कायम असल्याचे चित्र आहे. भाजपच्या माजी खासदार यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. अर्ज मागे न घेतल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर चंद्रकांत रघुवंशी-गावित या राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे.

अक्कलकुवातून डॉ. गावितांची बंडखोरी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (दि. ४) शेवटचा दिवस होता. त्यात अक्कलकुवातून डॉ. हीना गावित यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धारच केला आहे. त्यानुसार, त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपमधून बाहेर पडत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात
३० नोव्हेंबरला अर्ज छाननीनंतर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले. त्यांनी जोरकसपणे प्रचार सुरू केला. पक्षाने उमेदवारी घोषित केली तेव्हापासूनच काही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला होता. त्याला आता वेग आला आहे. दक्षिण पश्चिममध्ये भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, वंचितचे विनय भांगे, बसपचे सुरेंद्र डोंगरे, पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाचे ओपुल तामगाडगे यांनी घरोघरी प्रचार आरंभला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR