लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्त लातुरात दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दयानंद सभागृहात होणा-या स्वरविलास संगीत दरबार कार्यक्रमाची जय्यत तयारी होत आहे. मेवाती घराण्याचे जगविख्यात गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन होणार असून संगीत प्रेमींना विनामुल्य प्रवेश पास रिअल हनी शॉप प्रमोद सुपर मार्केटच्या खालील बाजूस नंदी स्टॉप लातूर या ठिकाणी उपलब्ध आहेत.
लातूरच्या आवर्तन, अष्टविनायक प्रतिष्ठान व मांजरा परिवार यांनी आयोजित केलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित आवर्तन ११४ वे स्वरविलास संगीत दरबार यामध्ये मेवाती घराण्याचे जगविख्यात गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन होणार आहे. त्यांना तबला संगत रोहित मुजुमदार, पुणे व संवादिनी साथ नीलय साळवी, पुणे हे करणार आहेत. या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु असून या कार्यक्रमाला लातूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वर विलास संगीत दरबारचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. या स्वर विलास दरबारचे उद्घाटन माजी आमदार तथा पश्चिम विभागीय विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास (दादा) पवार यांच्यां हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अष्टविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी, माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
स्वरविलास संगीत दरबार समारोहासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा रसास्वाद घ्यावा,असे आवाहन स्वर विलास संगीत दरबार २०२४ समारोहाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर तसेच डॉ. अजित जगताप, किरण भावठाणकर, नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, डॉ. संदिपान जगदाळे, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, संजय सुवर्णकार, महेश काकनाळे, केशव जोशी, हेमंत रामढवे, दत्ता पाटील, शंभुदेव केंद्रे, सुरेश कुलकर्णी, हरीराम कुलकर्णी, व्यंकटेश पांचाळ, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, डॉ. भदाडे, शशिकांत देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, गीता मुंढे, शर्वरी डोंगरे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, निलेश पाठक, विनायक राठोड, तेजस धुमाळ, विश्वजीत पांचाळ, अधिराज जगदाळे, देवदत्त कुलकर्णी व समस्त आवर्तन, अष्टविनायक परिवार व मांजरा परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.