लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटक्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणा-यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात ७ लाख ७९ हजार २७० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली ११ लाख ५० हजार रुपयाची दोन चारचाकी वाहन असा एकूण १९ लाख २९ हजार २७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुटख्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी पोलीस ठाणे चाकूर व देवणी हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटक्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणा-यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात ७ लाख ७९ हजार २७० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली ११ लाख ५० हजार रुपयाची दोन चारचाकी वाहन असा एकूण १९ लाख २९ हजार २७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री, वाहतूक, साठवणूक करताना मिळून आलेले इसम नामे आजम बशीर शेख, वय २१ वर्ष, रा. सराय गल्ली, रेणापूर जि. लातूर, रिहान अखिल कुरेशी, वय १८ वर्ष,रा. सराय गल्ली, रेणापूर जि. लातूर, दिलदार बडेसाब सय्यद, वय ४१ वर्ष, रा. इकबाल चौक, सनत नगर, लातूर याचे विरुद्ध पोलीस ठाणे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस पोलीस अंमलदार रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, साहेबराव हाके, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, मनोज खोसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे यांनी केली आहे.
फोटो ११