26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्या२३० कोटींचा वेतन घोटाळा? ५०,००० शासकीय कर्मचा-यांना ६ महिन्यांपासून पगारच नाही!

२३० कोटींचा वेतन घोटाळा? ५०,००० शासकीय कर्मचा-यांना ६ महिन्यांपासून पगारच नाही!

भोपाळ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशात तब्बल ५० हजार शासकीय कर्मचा-यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेलं नाही. या कर्मचा-यांची नावे अधिकृत कागदपत्रांमध्ये आहेत, त्यांचे कर्मचारी कोड आहेत, मात्र त्यांच्या खात्यावर वेतन जमा झालेले नाही.

ही बाब उघड झाल्यानंतर मोठा वेतन घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशाच्या कोषागार व लेखा विभागाचे आयुक्त भास्कर लक्षकार यांनी दिनांक २३ मे २०२५ रोजी राज्यातील सर्व ऊ१ं६्रल्लॅ ंल्ल िऊ्र२ु४१२्रल्लॅ डाा्रूी१२ (ऊऊड२) यांना पत्र पाठवले. या पत्रात कऋटकर प्रणाली अंतर्गत ज्यांचे वेतन डिसेंबर २०२४ पासून थांबले आहे अशा कर्मचा-यांची यादी तपासण्याचे आदेश देण्यात आले.

एकूण ५०,००० कर्मचारी असून यापैकी ४०,००० नियमित व १०,००० अनियमित (कंत्राटी/अस्थायी) कर्मचारी आहेत. सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे अंदाजे २३० कोटी रुपयांचे वेतन थांबवले गेले आहे.

कऋटकर प्रणालीमध्ये या कर्मचा-यांचे कोड अस्तित्वात असले तरी, त्यांची ओळख पडताळणी अपूर्ण आहे आणि कोणत्याही कर्मचा-यांची ‘एक्झिट प्रोसेस’ (सेवा समाप्ती) झालेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR