Homeलातूर२४ गावांतील ३६.६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

२४ गावांतील ३६.६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यात बुधवारी दि. १ एप्रिल रोजी  झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे व गारपिटीने रब्बी हंगामातील  शेती पिकांचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे . या  नुकसानीचे  पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिले आहेत असून  २४  गावांतील ६७  शेतक-यांचे  एकूण ३६ . ६  हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळेंयानी तहसीलदार व जिल्हा प्रशासनाकडे गुरुवार दि .२ एप्रिल सादर
केला.
रेणापूर तालुक्यात रेणापूर, पळशी, पानगाव, कारेपूर, पोहरेगाव या पाचही महसूल मंडळात काही गावात सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या पावसाने  गरसुळी, मोरवड व चाडगाव, वाला, तत्तापूर या  भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे ज्वारी पिकांच्या कणसांसह मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. याशिवाय गहू, हरभरा व करडई पिकांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वा-यामुळे व गारपीटीमुळे आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे.   नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत  जाहीर करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR