२४ तासांत दोन खून; नांदेड पुन्हा हादरले; बाफना व सिडकोतील रक्तरंजित घटनांनी गँगवॉरची चर्चा

नांदेड : प्रतिनिधी
शहर व परिसरात शनिवारी ८ ऑगस्ट रोजी अवघ्या २४ तासांच्या आत २ खुनाच्या घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाफना परिसरातील संगम कार बाजारसमोर सुमारे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको परिसरातील दूध डेअरीजवळ चंदनसिंग बावरी या युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याचे समोर आले. सलग २ खुनांच्या घटनांमुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले असून सिडकोतील खुनामुळे पुन्हा गँगवॉरची चर्चा रंगली आहे.

शनिवारी सकाळी बाफना परिसरातील संगम कार बाजार हे दुकान उघडण्यासाठी आलेल्या व्यापा-यांना दुकानासमोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तत्काळ इतवारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांच्यासह इतवारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आगलावे व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे दगडाने डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. रात्रीच्या वेळी नेमके काय घडले, मृत व्यक्ती कोणासोबत होती? त्याच्यावर हल्ला कोणी केला? तसेच खुनामागील कारण काय, याचा तपास इतवारा पोलीस करीत आहेत. घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

तर बाफना येथील घटनेची चर्चा सुरू असतानाच दुपारच्या सुमारास सिडको परिसरातील दूध डेअरीजवळ एका युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली. चंदनसिंग बावरी असे मृत युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्यासह ग्रामीण पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके सक्रिय करण्यात आल्याची माहिती आहे.

गँगवॉरची पुन्हा चर्चा; पोलिसांसमोर आव्हान
एकाच दिवशी शहरातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाच्या घटना समोर आल्याने नांदेडमध्ये पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. सिडको भागातील दुध डेअरी जवळील खुनाची घटना ही गँगवारशी संबंधित असल्याची चर्चा होत होती.पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी, तांत्रिक माहिती आणि घटनास्थळी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news