राज्याच्या शिक्षण विभागाने केली घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठीची उन्हाळी सुटी जाहीर झाली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांना २ मेपासून सुटी जाहीर करण्यात आली. १४ जूनपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली तर पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्य विदर्भ व इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरु होणार आहेत.
जून महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ््याच्या सुटीनंतर राज्य मंडळाच्या शाळा १५ जून ते २९ जूनपर्यंत सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते ११:४५ यावेळेस सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर ३० जूनपासून विदर्भातील शाळाही नियमित सुरू होतील. राज्यातील इतर मंडळांच्या शाळांचे वेळापत्रक पाहता व त्या शाळांमधील विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याने सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटी याबाबत सुसूत्रता राहावी, म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्यांची निश्चिती करण्यात येते.
















