लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारक-यांसाठी पंढरपूरचा विठ्ठल अतिशय महत्वाचा असून आषाढी एकादशी हा त्यांच्यासाठी मोठा सण असतो. या एकादशीच्या निमित्ताने केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातील वारकरी आणि भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. लातूर जिल्ह्यातूनसुद्धा हजारो वारकरी पंढरपूरकडे जात असतात. या वारक-यांसाठी श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दि. १६ जूलै
रोजी सकाळी ११ वाजता विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते वारक-यांसाठी मोफत एस. टी. बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
लातूरातील सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारकरी भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात येते. या उपक्रमाच्या २४ व्या वर्षी तब्बल ३१ बससेच्या माध्यमातून सत्संग प्रतिष्ठानने १७०० वारक-यांना पंढरपूरला रवाना केले आहे. त्यानिमित्ताने येथील मध्यवर्ती बसस्थानकात आयोजित कार्यक्रमात विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मोफत वारकारी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष कैलास राठी, एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक जानराव, डॉ. सारिका देशमुख यांची उपस्थिती होत्.ाी. यावेळी पंढरपूरला जाणा-या वारक-यांना श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते फराळाचे साहित्य, भोजन, पाणी बॉटल, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, बॅग आदी देऊन सत्कार करण्यात आला.
वारक-यांसाठी पंढरपूरचा विठ्ठल हे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी ही या वारक-यांसाठी मोठा उत्सव असतो. त्यामुळेच मराठवाड्यातून हजारो वारकरी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. या वारकरी भाविकांची सेवा व्हावी आणि त्यांचा पंढरपूरचा प्रवास सुखकर व्हावा याकरीता श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने गत २४ वर्षापासून मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात येते. या उपक्रमात आपल्यालाही सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त झाले अशी भावना पंढरपूरला जाणा-या वारक-यांनी व्यक्त केली.
श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीख यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या वतीने मागील काळात आयोजीत केलेल्या विविध सांकृतिक आणि सांप्रदायीक कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी कैलास राठी, अशोक गोविंदपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री सत्संग प्रतिष्ठानचे सचिव चंदूसेठ लड्डा, कार्याध्यक्ष रमेशचंद्र भुतडा, दिलीप माने, प्रकाश कासट, लक्ष्मीकांत सोनी, नंदकिशोर लड्डा, सतिश पवार, जुगलकिशोर झंवर, रमण पारीक, गोपाल पारीक, संग्राम खंदारे, ब्रिजमोहन मालू, राजा मणियार, सुरेश मालू, शाम खटोड, शिवाजी गाडेकर, रामदास पवार, बालाजी बारबोले, वसंत ढमाले, अनवरभाई केतन हलवाई, नाना लोखंडे, पंडित धुमाळ, राम शिंदे, गुलाब चव्हाण, एस. टी. महामंडळाचे चपटे, तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, वारकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.े