22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूर४० वर्षानंतर ‘आम्ही मित्र एकत्र’ ‘देशिकेंद्र’मध्ये स्नेहमिलन 

४० वर्षानंतर ‘आम्ही मित्र एकत्र’ ‘देशिकेंद्र’मध्ये स्नेहमिलन 

लातूर : प्रतिनिधी
तब्बल ४० वर्षानंतर वर्गमित्रांनी ‘आम्ही मित्र एकत्र’ असा अगळा वेगळा उपक्रम साजरा करत गुरुजनांचा गौरव व वर्गमित्र खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला. देशिकेंद्र विद्यालय लातूर येथील १९८४ च्या  दहावी वर्गातील विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले असताना आपला वर्गमित्र डॉ. शिवाजी काळगे हा खासदार झाल्याचा आनंदाने त्यांचा सत्कार करावा व गुरुजनांचा ही सत्कार करावा या उद्देशाने लातूर शहरात वास्तव्यात असलेल्या मित्रांनी २१ जुलै रोजी हॉटेल अरोमा येथे ४० वर्षानंतर आम्ही मित्र एकत्र गुरुपुजन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे अभिनंदन व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, शिक्षक बुरांडे, गुडे, लवटे, वाघमारे, करपे, निला, बिडवे, व्हलकंबे, बी. पी. कुलकर्णी, महाजन, कारभारी, कत्राळे, विभुते आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते.
प्रारंभी खा. डॉ. शिवाजी काळगे व उपस्थित गुरुजनांच्या हस्ते यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. गुरु पोर्णिमेनिमित्य गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. तर लातूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार वर्गमित्रांच्या हस्तेह्यात्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनिल देशपांडे यांनी केले. सतिश बिराजदार यांनी मनोगत व्यक्त्त केले.  तर वर्गमित्राशी संवाद साधताना खा. डॉ शिवाजी काळगे म्हणाले नेते, कार्यकर्ते व प्रत्येक व्यक्त्ती पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत निवडणूक जिंकणे शक्य नाही.
माझ्या विजयासाठी मतदारांनी दिलेल्या आशिर्वादाची परतफेड करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्नकरेन, असे ते म्हणाले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुध्द कुर्डुकर, विश्वास लातुरकर, उदय देशपांडे, सुनिल देशपांडे, जयराज लखादिवे, यहीया कासेरी, रावळे बालाजी, बाळासाहेब मस्के पाटील, डॉ. सतीश हंडरगुळे, अमरनाथ बिडवे, सुधिर कानडे, सतिश चलवा, मिलिंद बिलोलीकर यांच्यासह शहरातील वर्गमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR