लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयाच्या वन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून वृक्ष लागवडीची माहिम हाती घेतली जाणार आहे. या वर्षी पावसाळयात जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीला ५ हजार ६५३ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायती ४४ लाख ४३ हजार २५८ वृक्षांची लागवड करून संगोपनही करणार आहेत.
यावर्षी जिल्हयात अवकाळी पावसाने नियोजीत वेळेच्या पूर्वीच आगमन करून जिल्हयात पावसाळी वातावरण तयार केले आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीला गती मिळण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत या वर्षीच्या पावसाळयात रोपांची निर्मिती करून प्रत्येक ग्रामपंचायतीने ५ हजार ६५३ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. या पावसाळयात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ४४ लाख ४३ हजार २५८ वृक्षांची लागवड करून संगोपनही केले जाणार आहे.