36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूर९३ हजार मतदारांपर्यंत पोचली काँग्रेसच्या न्याय गॅरंटीची माहिती 

९३ हजार मतदारांपर्यंत पोचली काँग्रेसच्या न्याय गॅरंटीची माहिती 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या प्रचारार्थ न्याय यात्रेमार्फत एलईडी व्हॅनच्या साह्याने प्रचाराचा प्रारंभ लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २३ एप्रिल रोजी औसा विधानसभा मतदारसंघातील बिरवली, टाका येथून हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. गेल्या ११ दिवसांत ही न्याय यात्रा ८१५ गावांत पोचली असून ९३ हजार मतदारांपर्यंत काँग्रेसच्या न्याय गॅरंटीची माहिती पोचली.
प्रामुख्याने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारचा नाकर्तेपणा खोटी आश्वासने, शेतक-यांची केलेली फसवणूक, बेरोजगाराची केलेली फसवणूक, शेतीपूरक लागणा-या साहित्यावर जीएसटीचा अधिभार लावून शेतक-यांची केलेली पिळवणूक या एलईडी वाहनाच्या माध्यमातून गावोगाव जाऊन प्रचार करण्यात येत आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रचार समोर आला ते आपल्या सर्वांचे नेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण  मंत्री लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही न्याय यात्रा जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये आजतागायत ८१५ गावांतून ९३ हजार लोकापर्यंत काँग्रेसचा जाहीरनामा, लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती व भाजपा सरकारचे अपयश पोहोचवण्यात येत आहे.
न्याय यात्रेला प्रत्येक गावोगावी प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद, उत्साह पाहायला मिळत आहे  लातूर जिल्ह्यामध्ये सत्ताधा-यांच्या  विरोधात परिवर्तनाची लाट तयार झाली असून प्रत्येक गावोगावी बदल घडवण्याची भाषा जनता आमच्याशी करत आहे.  न्याय यात्रेच्या माध्यमातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत काँग्रेस पक्षाच्या पाच न्याय योजना व २५ गॅरंटी पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी होत असुन काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती न्याय यात्रेचे समन्वयक अ‍ॅड. प्रवीण पाटील यांनी दिली.
या न्याय यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रशिक्षित कार्यकर्ते अ‍ॅड. हंसराज सोमवंशी, बाळकृष्ण माने, कमलाकर अनंतवाड, विवेक जाधव, मोहन पाटील, संगीता पतंगे, अभिमान भोळे, अ‍ॅड. बालाजी भोसले, सलीम तांबोळी, बाळासाहेब करमुडे, विरसेन भोसले आदी कार्यरत असून त्यांना लातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक लातूर ग्रामीणचे निरीक्षक अनुपजी शेळके, लोहा कंधारचे निरीक्षक विजय देशमुख, अहमदपूरचे निरीक्षक विक्रांत गोजमगुंडे, नलंगा मतदारसंघाचे निरीक्षक संतोष  देशमुख, लातूर शहर मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे आदींचे सहकार्य लाभत आहे. हि न्याय यात्रा यशस्वी करण्याकरिता समन्वयक तथा रेणा साखर दिलीपनगरचे संचालक अ‍ॅड. प्रवीण पाटील, एलईडी निरीक्षक प्रा. सुधाकर मोरे पाटील, समाजमाध्यम विभागाचे अजित काळदाते काम पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR