25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयभाजपच्या पहिल्या यादीतील १० महत्वाच्या बाबी

भाजपच्या पहिल्या यादीतील १० महत्वाच्या बाबी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, ओम बिर्ला यांच्यासह ३४ मंत्र्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या रिंगणात आणण्यात आले. भाजपने उमेदवारी देताना जिंकून येईल त्याला तिकीट अशा रणनीतीचा वापर केला. तसेच जातीचे समीकरण देखील साधण्याचा प्रयत्न केला.

१. सध्याच्या ३३ खासदारांना डावलून नव्या चेह-यांना पहिल्या यादीत संधी देण्यात आली. यात प्रज्ञा ठाकूर, हर्षवर्धन, रमेश बिगुरी, मिनाक्षी लेखी, रामेश्वरम तेली, केपी यादव, गौतम गंभीर यांचा पत्ता कट करण्यात आला.

३. भाजपने केंद्रीय मंत्र्यांची फिल्डिंग लावली. यात मनसुख मंडाविया, जितेंद्र सिंग, सर्बानंद सोनोवाल, गजेंद्रा शेखावत, भुपेंद्रा यादव, जी. किशन रेड्डी, किरेन रिजीजू, ज्योतिरादित्य शिंदे, राजिव चंद्रशेखर, अर्जुन राम मेघवाल आणि अर्जुन मुंडा यांना संधी देण्यात आली.

४. दिल्लीमध्ये भाजपने मोठे बदल केले. रमेश बिदुरी, पर्वेश वर्मा, मिनाक्षी लेखी, हर्षवर्धन यांचे तिकीट कापण्यात आले. त्याऐवजी प्रविण खंडेलवाल यांना चांदणी चौक, कलमजीत सेहरावत वेस्ट दिल्ली, सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना नवी दिल्ली आणि रामवीर सिंग बिधुरींना दक्षिण दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली.

५. पश्चिम बंगालच्या असनसोल मतदारसंघातून भाजपने भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यास उमेदवारी दिली.

६. भाजपच्या यादीमध्ये २८ महिला आणि २७ तरुण चेहरे आहेत. २८ एससी, १८ एसटी, ५७ ओबीसी उमेदवारांना संधी देण्यात आली.

७. पॅरालिम्पियन देवेंद्र झांजरिया यांना राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून संधी देण्यात आली. झांजरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले होते.

८. मध्य प्रदेशातून भाजपने प्रसिद्ध चेहरे ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराज स्ािंह चौहान यांना संधी दिली. शिवराज यांना मुख्यमंत्रीपद डावलण्यात आले होते. प्रज्ञा ठाकूर यांचा पत्ता कट करण्यात आला.

९. उत्तर प्रदेशातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. हेमा मालिनी, रवी किशन, महेश शर्मा, एसपीएस बघेल, साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते कृपाशंकर सिंंह यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली.

१०. काँग्रेस नेते शशी थरुर यांना टक्कर देण्यासाठी तीन वेळा राज्यसभा खासदार असलेले राजीव चंद्रशेखर यांना पुढे करण्यात आले. थरुर केरळातील तिरुअनंतपुरममधून तीनवेळा लोकसभा खासदार आहेत. केरळमधून ए. के. अँटनींच्या मुलास भाजपने उमेदवारी दिली.

११. सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे अजय मिश्रा तेनी यांना खेरी मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले. तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा तेनी याला लखीमपूर खेरी येथे चार शेतक-यांना चिरडल्याप्रकरणी तुरुंगवास झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR