25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये १० माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये १० माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

दंतेवाडा : ‘लोन वरटू गो बॅक होम’ मोहिमेमुळे प्रभावित होऊन छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये १० माओवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले आहे.

पोलिसांच्या आवाहनाचा माओवाद्यांवर व्यापक परिणाम झाला असून, त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून लोकशाही आणि संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे. आत्मसमर्पण केलेले माओवादी इंद्रावती एरिया कमिटीमध्ये सक्रिय होते.

आत्मसमर्पण केलेले सर्व माओवादी नक्षल बंद दरम्यान रस्ते खोदणे, झाडे तोडणे आणि नक्षलवादी बॅनर पोस्टर लावण्याच्या घटनांमध्ये सामील होते. लोन वरटू मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ८१५ माओवाद्यांसह १८० पुरस्कृत माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे वचन दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR