राज्यात ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या!

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने गुरूवारी ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी स्तरावरील अधिका-यांचा समावेश आहे.

रवींद्र खेबुडकर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांची आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए), पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र बावणे आयुक्त, जीएसडीए, पुणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अपूर्वा बासुर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशाल खत्री प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डोनुरू अनन्या रेड्डी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी.के. सिद्धार्थ रामकुमार अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कुश मोटवानी अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा तथा उपविभागीय अधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश वर्मा, अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशिम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंदला साईकिरण अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा तथा उपविभागीय अधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश कुमार मीना अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव तथा उपविभागीय अधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवांश सिंह अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल रात्रीचे बातमीपत्र 03.09.26
22:04
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 03.09.26
28:03
Video thumbnail
BIG BREAKING | वसमतमध्ये २८८ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; उपविभागीय कार्यालयासमोर अंत्यसंस्कार
01:02
Video thumbnail
BIG BREAKING | जांब बुद्रुकमध्ये कडकडीत बंद, नांदेड–बिदर महामार्गावर रास्ता रोको
00:54
Video thumbnail
BIG BREAKING | तुळजापूर–नळदुर्ग मार्ग रोखला; मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
00:53
Video thumbnail
BREAKING | जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूरमधील शाळा-महाविद्यालये बंद
02:46
Video thumbnail
BIG BREAKING | औशात मराठा बांधव आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
02:52
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल दुपारचे बातमीपत्र 03.09.26
16:47
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; चार तालुके बंद, उद्या संपूर्ण जिल्हा बंद
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | मराठ्यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ केली कडकडीत बंद; गंज गोलाईत शुकशुकाट
04:25
Video thumbnail
BREAKING | मराठा आरक्षणासाठी लातूर बंद! सकाळपासूनच मराठा बांधव रस्त्यावर
04:01
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी उमरगा कडकडीत बंद; मुस्लिम समाजाचाही उत्स्फूर्त पाठिंबा
02:12
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली कथित देहव्यापाराचा पर्दाफाश; 7 महिलांची सुटका
00:54
Video thumbnail
Nanded Maratha Protest|नांदेडमध्ये मराठा आंदोलनाचा एल्गार! चार प्रमुख महामार्ग आंदोलकांनी रोखले
04:20
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:37

Latest news