22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमध्ये १२ जण बुडाले, एकाचा मृत्यू

पालघरमध्ये १२ जण बुडाले, एकाचा मृत्यू

अर्नाळ्यातील घटना; बारा जणांची बोट समुद्रात

पालघर : पालघरच्या अर्नाळ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. अर्नाळा समुद्रात बोल उलटली, या बोटीमध्ये एकूण १२ जण होते. त्यातील ११ जण सुखरूप असून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारच्या अर्नाळा समुद्रात मोठी बोट दुर्घटना घडली आहे. अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट कलंडली आहे. या बोटीत एकूण १२ जण होते. त्यातील ११ जण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पावसाळ्यापूर्र्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने या बोटीतून विटा व वाळू नेली जात होती, मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असताना ही बोट समुद्रातच उलटली.

पाठीमागून येणा-या एका बोटीमुळे ११ जण सुखरूप वाचले. मात्र या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. अर्नाळा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्याकडून शोध मोहिम राबवण्यात आली. कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर व खासगी बोटीच्या मदतीने त्यांनी बेपत्ता असलेल्या या व्यक्तीचा शोध घेतला. अखेर २४ तासांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR