पुणे : प्रतिनिधी
बारावी परीक्षेत यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभाग पाहिला तर लातूर पॅटर्न सर्वात शेवटी गेला आहे. बारावीचा निकाल एकूण ८९.७९ टक्के लागला असून, कोकण विभाग अव्वल तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये जी परीक्षा घेण्यात आली त्यात कोकण विभागाचा ९४.१४ टक्के, पुणे विभागाचा ९१.२५ टक्के, अमरावती विभागाचा ९०.९२ टक्के, नाशिक विभागाचा ९०.७२ टक्के, मुंबई विभागाचा ९०.०८ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८९.९७ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८.८६ टक्के, नागपूर विभागाचा ८८.६७ टक्के आणि लातूर विभागाचा ८४.१४ टक्के निकाल लागला असून एकूण निकाल ८९.९७ टक्के एवढा लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज, शनिवार, २ मे २०२६ रोजी महाराष्ट्र ऌरउ इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील; तसंच, निकालाची लिंक सक्रिय होताच त्यांचे गुणपत्रक त्वरित उपलब्ध होईल. गेल्या वर्षी हे निकाल ५ मे रोजी जाहीर करण्यात आले होते; मात्र या वर्षी, निकाल तीन दिवस आधीच प्रसिद्ध केला जातोय. विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. लाखो विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची आतुरतेनं वाट पाहिली. बोर्डानं सर्व तयारी पूर्ण करुन, निकाल प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण करण्यावर भर दिला आहे.
निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स : विद्यार्थ्यांना महाराष्ट्र HSC निकाल २०२६ खालील अधिकृत वेबसाइट्सवरून तपासता येईल.
https://mahahsscboard.in
mahresult. nic. in
https://results.digilocker.gov.in
https://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
याशिवाय, डिजीलॉकर आणि एसएमएस सुविधेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. डिजीलॉकरनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते.
यंदा राज्यभरात एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
विज्ञान शाखा: ७,९९,७७३ विद्यार्थी
कला शाखा: ३,८०,६९२ विद्यार्थी
वाणिज्य शाखा: ३,२०,१५२ विद्यार्थी

