27.2 C
Latur
Monday, March 9, 2026
अहमदपूर मतदारसंघासाठी २५ कोटींचा निधी
अहमदपूर : प्रतिनिधी
सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पात अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांना २५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला असून लवकरच या निधीची सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण होऊन लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
चाकूर तालुक्यातील उजळंब, येरोळ, साकोळ आनंदवाडी या रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुरंबी, सुगाव ते देवांग्रा, नळेगाव ते राज्य क्रमांक २४० या रस्त्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धानोरा, सताळा , महाळगी , जाणवळ, शिवणखेड ,ममदापूर बोरी, बिंदगीहाळ,बोकनगाव, मुगाव या रस्त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  अहमदपूर शहरातील थोडगा रोड या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सरकारने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR