22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

एसटी कर्मचारी बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल

गुणरत्न सदावर्तेंना धक्का!

मुंबई : एसटी कर्मचारी सहकारी बँकेचे १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत १९ पैकी केवळ ५ संचालक हजर होते. गैरहजर असलेले सर्वजण सदावर्तेंच्या विरोधात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत जे १४ संचालक गैरहजर होते ते दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही यात म्हटले आहे. एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी एकहाती सत्ता काबीज केली होती. तिथेच आता सदावर्ते यांना धक्का बसला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यपद्धतीवर संचालक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच १४ संचालक नॉट रिचेबल झाले आहेत तर केवळ ५ संचालकच सदावर्तेंच्या बाजूने आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचा-यांच्या लढ्याला यश
राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला होता. यावेळी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांचा लढा लढला होता. एसटी महामंडळाचे सरकारी सेवेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. पण सरकारी सेवेतील कर्मचा-याप्रमाणे पगार आणि भत्ते तसेच सुविधा देण्याचे सरकारने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. पण यामुळे सदावर्ते यांना चांगलेच बळ मिळाले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR