Homeराष्ट्रीय सिलेंडरच्या स्फोटात ७ जण होरपळले

 सिलेंडरच्या स्फोटात ७ जण होरपळले

भिवानी : वृत्तसंस्था
 राजस्थानमधील भिवानी येथील साथलका गावात असलेल्या बिल्लू कॉलनी परिसरात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका घरात सकाळी जेवण बनवताना गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. घरात अचानक झालेल्या या स्फोटामुळे एखाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच स्फोटानंतर घटनास्थळावर गडबड गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्फोटाची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेतली.
घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना तातडीने उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची ओळख राम सिंह, ममता, भुवेश, पंकज, छगन, काजल, किशनवती यांच्या रूपात झाली आहे. सर्व जखमींना भिवाडी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी त्यांची अंत्यवस्थ अवस्था पाहून त्यांना अधिक उपचारांसाठी अलवर येथे पाठवण्यात आले.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट झाला तेव्हा घरामध्ये जेवण तयार करण्याची तयारी सुरू होती. त्यादरम्यान, गॅस सिलेंडरमधून गळती होत होती. त्यामुळे जेव्हा गॅस पेटवण्यासाठी माचिसची काडी पेटवली गेली. तेव्हा अचानक मोठा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले. तसेच ७ जण जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR