काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाले. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.
नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत १५७ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०० लोक जखमी झाले. भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यात १,८०० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.