28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeराष्ट्रीयलडाखमध्ये आठ तासांत दोनदा भूकंप

लडाखमध्ये आठ तासांत दोनदा भूकंप

लडाख : लडाखमध्ये शनिवारी आठ तासांत दोनदा भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, पहिला भूकंप सकाळी ८.२५ वाजता झाला, ज्याची तीव्रता ३.४ इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र ३५.४४ अंश अक्षांश आणि ७७.३६ अंश रेखांशावर पृष्ठभागापासून १० किमी खाली होते.

दुसरा भूकंप दुपारी ४.२९ वाजता झाला. त्याची तीव्रता ३.७ होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू ३५.२३ अंश अक्षांश आणि ७७.५९ अंश रेखांश पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खोलीवर होता. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की केंद्रशासित प्रदेशात कोठेही नुकसान झाले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR