लातूर जिल्हा बँकेचे ३५,४०९ शेतकरी पात्र
लातूर : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ शासन निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ जाहीर केलेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व राज्याचे सहकारी मंत्री  बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व दुस-या यादीमध्ये लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र ठरलेले असून रु. २१९ कोटी रक्कमेचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.
प्राप्त यादीपैकी आजपर्यंत २२ हजार २८४ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केलेले आहे. अद्यापही १३ हजार १२५ शेतक-यांनी (ई-केवायसी) पूर्ण केलेले नाही त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील उर्वरित पात्र शेतक-यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून घ्यावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केलेले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पात्र शेतक-यांचा ‘अ‍ॅग्रीस्टॅक आयडी’ असणे व आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील ८९३४ शेतक-यांनी अजूनही ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ मंचावर नोंदणी न केल्यामुळे त्यांचा फार्मर आय डी निघाला नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) होऊ शकलेले नाही, त्यामुळे अशा शेतक-यांनी तात्काळ आपले ‘अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ काढून घ्यावेत व आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. ज्या शेतक-यांकडे शेतजमीन उपलब्ध नाही अशा शेतक-यांचे ‘अग्रीस्टॅक फार्मर आयडी’ निघणे कठीण असल्यामुळे अशा शेतक-यांच्या बाबतीत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news