27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात भीषण अपघातात २ ठार

पुण्यात भीषण अपघातात २ ठार

नाशिकमध्येही बस-कारची धडक, २ महिलांचा मृत्यू

पुणे : अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. कधी रस्ते अपघात तर कधी रेल्वे अपघाताच्या घटना घडत असून रस्त्यांवरील खड्डे तसेच ओव्हरस्पीड गाड्या हे रस्ते अपघाताचे मुख्यत्वे कारण असल्याचे दिसून येते. आता, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. या भीषण अपघातात ४ जणांना मृत्यू झाला आहे. पुण्यात नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. तर, नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळही बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता.

राज्यात एकीकडे पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे पुणे व नाशिकमध्ये भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन विविध ठिकाणच्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ंिदडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर दोन्हीही गाड्यांनी अचानक पेट घेतल्यामुळे सगळ्यांची दमछाक झाली होती. बसने पेट घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या कारला पाचारण करण्यात आले, पण तोपर्यंत आगीत बस आणि कर जळून खाक झाली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरही लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर ंिपपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. आळे फाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणा-या बसची समोरुन येणा-या कारला समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये, कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून रिया गायकर व कुसुम शिंगोटे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मात्र, या अपघात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा नामा केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR