26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeपरभणी११ केंद्रावर २२०८ परिक्षार्थ्यांनी दिली परीक्षा

११ केंद्रावर २२०८ परिक्षार्थ्यांनी दिली परीक्षा

परभणी / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटीलांच्या ३०५ पदाकरिता रविवार दि. २८ रोजी ११ केंद्रावर घेण्यात आलेल्या परिक्षेस २३०५ परीक्षार्थ्यांपैकी २२०८ परिक्षार्थ्यांनी परिक्षा दिली. दरम्यान या परिक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील पोलिस पाटीलांची ३०५ पदे रिक्त होती. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार दि. २८ रोजी पोलिस पाटील पदाकरिता शहरातील ११ केंद्रावर दु २ ते ४ या वेळात परिक्षा घेतली. या परिक्षेसाठी २३०५ परिक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २२०८ परिक्षार्थी उपस्थित होते तर ९७ परिक्षार्थी गैरहजर राहिले. शहरातील बालविद्या मंदिर हायस्कुलमध्ये ४६४, शारदा महाविद्यालयात ९५, श्री शिवाजी पॉलीटेक्नीक इन्स्टीट्युटमध्ये १८९, श्री शिवाजी महाविद्यालय ४५७, रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय १०१, १२३, १०६, जिल्हा परिषद कन्या प्रशालेत २१६, बाल विद्या मंदिर हायस्कुल वैभव नगर १७८, गांधी विद्यालय २३३ परिक्षार्थ्यांनी परिश्रा दिला. यात ९७ परिक्षार्थी गैरहजर राहिले. या परिक्षेसाठी ३६ पर्यवेक्षक, ११२ समवेक्षक, ११ सहाय्यक कर्मचारी, २२ शिपायी यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान या परिक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी डी.बी. शेवाळे, कैलास मठपती आदींनी भेटी देवून पाहणी केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR