32.8 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeराष्ट्रीयवजन कमी करणारी बनावट औषधे विकणा-या २५० वेबसाईट बंद

वजन कमी करणारी बनावट औषधे विकणा-या २५० वेबसाईट बंद

मुंबई : सायबर सिक्युरिटी फर्म ब्रँडशील्डने जीएलपी-१ प्रवर्गातील वजन कमी करणा-या आणि मधुमेहावरील बनावट औषधे विकणा-या २५० हून अधिक वेबसाईट्स हटवल्या आहेत, अशी माहिती कंपनीचे सीईओ योव केरेन यांनी दिल्याचे वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, ब्रँडशील्डने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी चयापचय स्थितींवर उपचारांसाठी औषधांची विक्री करणा-या २७९ पैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त वेबसाईट्स जीएलपी-१ औषधांशी संबंधित होत्या.

कंपनीचे सीईओ योआन केरेन म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी ६,९०० हून अधिक बनावट औषधे हटवण्यात आली आहेत.
यामध्ये भारतातील ९९२, इंडोनेशियातील ५४४, चीनमधील ३६४ आणि ब्राझीलमधील ११४ औषधांचा समावेश आहे.

बेल्जियम, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेटससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि इतर बनावट औषधांमुळे घातक परिणाम नोंदवले गेले आहेत, या औषधांद्वारे कंपन्या लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करतात.

ही औषधे मधुमेहासाठी विकसित केली गेली आहेत. तसेच यामुळे भूक कमी आणि पोट अधिक हळू रिकामे होते. ही औषधे रुग्णांना त्यांचे वजन सरासरी २० टक्के कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बनावट औषधांचा सुळसुळाट झाला आहे. बेल्जियम, ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड स्टेटससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि इतर जीएलपी-१ च्या बनावट औषधांमुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR