40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटलांच्या सहका-यावर प्राणघातक हल्ला

मनोज जरांगे पाटलांच्या सहका-यावर प्राणघातक हल्ला

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीने खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
या घटनेत अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराईत उघडकीस आला आहे. अमोल खुणे हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत. त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना न्यायालय परिसरात मारहाण केली होती. गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाटा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हल्ला करणारे आरोपी फरार झाले असून, या हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल खुणे यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे, हल्ला करणा-या आरोपींना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करण्यात येत आहे. तलवाडा पोलिस ठाण्याच्या वतीने घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR