40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रविशाल पाटील यांनी सांगलीतून भरला अपक्ष अर्ज

विशाल पाटील यांनी सांगलीतून भरला अपक्ष अर्ज

सांगली : काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी आज बंडखोरी करत सांगलीतून लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विशाल पाटील यांच्या समर्थकांनी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शनही केले. या रॅलीत हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी काँग्रेसच भाजपला पाडू शकते, असे म्हणत सांगलीत पक्षाची ताकद असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष शिवसनेला मतदारसंघातील परिस्थिती समाजावून सांगेल आणि १९ तारखेला ३ वाजेपर्यंत आपणाला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वासही विशाल पाटलांनी व्यक्त केला.

दरम्यान, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा न करता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. होती. यामुळे सांगलीत काँग्रेस पक्षामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढणार असल्याचे संकेत दिले होते.

या दरम्यान त्यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली होती. विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली यामुळे काँग्रेस नेते विश्वजित कदम देखील नाराज होते, त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR