29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्र२,६०० बनावट कंपन्या अन् ‘जीएसटी’ला हजारो कोटींचा चुना

२,६०० बनावट कंपन्या अन् ‘जीएसटी’ला हजारो कोटींचा चुना

नोएडा : देशात २,६०० पेक्षाही अधिक बनावट कंपन्या उघडून भारत सरकारच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणा-या टोळीतील दोन म्होरक्यांना पोलिसांनी अटक केली. इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन दोघांनी फसवणूक केली होती.

अनेक दिवसांपासून वॉन्टेड असलेल्या आरोपींवर नोएडा पोलिसांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आतापर्यंत या टोळीतील ३२ आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी व्यावसायिक असून ते मेटलचा व्यवसाय करतात.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, जीएसटी फसवणुकीचे सूत्रधार अजय शर्मा आणि संजय जिंदाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे दोघेही हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत. आरोपी संजय जिंदाल हा मेसर्स एएस ब्राउनी मेटल अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेडचा मालक असून अजय शर्मा हा मेसर्स क्रिस्टल मेटल इंडस्ट्रीजचा मालक आहे.

संजय जिंदाल याने सुमारे १७ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे आणि अजय शर्माने ८.५ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय ज्ािंदालने त्याच्या कंपनीच्या नावाखाली सुमारे २० बनावट कंपन्या तयार केल्या.

१२ कोटींची मालमत्ता जप्त
गेल्या महिन्यात, नोएडा पोलिसांनी जीएसटी घोटाळ्यात गुंतलेल्या टोळीच्या सदस्यांची सुमारे १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती, ज्यामध्ये दिल्लीतील अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तांचाही समावेश होता.

हे प्रकरण जून २०२३ मध्ये उघडकीस आले जेव्हा फसवणूक करणा-यांनी एका पत्रकाराच्या पॅन तपशीलाचा वापर करून बनावट कंपन्यांच्या नोंदणीसाठी अर्ज केला आणि दोन फर्मची नोंदणी केली होती.

जीएसटी घोटाळा म्हणून ओळखले जाणारे हे प्रकरण जून २०२३ मध्ये उघडकीस आले होते आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून हजारो बनावट कंपन्यांनी सरकारी तिजोरीचे नुकसान केले. अधिका-यांच्या मते, पोलिस तपास शेकडो बनावट कंपन्या आणि त्यांच्याकडून सुमारे १०,००० कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले असून या प्रकरणात आतापर्यंत दोन १२ पेक्षाही अधिक लोकांना अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR