40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयचिमुकल्यांची हत्या करणा-या नराधमाचा भाऊ अटकेत

चिमुकल्यांची हत्या करणा-या नराधमाचा भाऊ अटकेत

बदायूं : बदायूंमधील आयुष आणि अहानच्या दुहेरी हत्याकांडासाठी २५,००० रुपयांचे बक्षीस असलेला फरार आरोपी जावेदचा व्हीडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करत आहे. आमच्या मुलांचे त्यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. साजिदने सर्व काही केले आहे, मी तिथे नव्हतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या भीतीने तो दिल्लीला पळून गेला. आता मला पोलिसांकडे घेऊन जा. पोलिसांनी जावेदला अटक केली आहे.

व्हीडीओमध्ये जावेद लोकांना पोलिसांकडे घेऊन जाण्याची विनंती करत आहे. व्हीडीओमध्ये लोकांनी जावेदला हत्येचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, त्याचे हत्या झालेल्या मुलांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. त्याने काही केले नाही, मुलांची हत्या त्याच्या मोठ्या भावाने केली. त्याने असे का केले हे त्याला माहीत नाही.

घरातील गर्दी पाहून तो घाबरला आणि दिल्लीला पळून गेला. त्याच्या भावाने असे कृत्य केल्याचे अनेकांनी त्याला फोनवर सांगितले. बदायूं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेदने गुरुवारी सकाळी बरेलीतील बारादरी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन येत आहे.

बाबा कॉलनीतील रहिवासी विनोद यांचा मुलगा १२ वर्षीय आयुष आणि सहा वर्षीय अहानची साजिदने वार करून हत्या केली. हत्येनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण होते. संतप्त लोकांनी साजिदच्या दुकानाची जाळपोळ आणि तोडफोड केली होती. वाढत्या गोंधळामुळे पोलिसांनी साजिदला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, तो चकमकीत ठार झाला. त्याचवेळी मुलांचे वडील विनोद यांच्या वतीने साजिद आणि त्याचा लहान भाऊ जावेद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेव्हापासून साजिदचा भाऊ आरोपी जावेदही फरार होता. बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. जावेदचा व्हीडीओ गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद हा बरेली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला आणण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. साजिदचे वडील आणि काकांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR