लातूर : दीपोत्सवाला सुरवात झाली असून शुक्रवारी धनत्रयोदशीच्या पुर्वसंध्येस ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती. सराफ दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहकांची रेलचेल दिसून आली. सोने, चांदीच्या दरात गतवर्षापैक्षा यंदा वाढ झालेली असतांनादेखील मोठ्याप्रमाणात सोने चांदी खरेदीत मोठी उलाढाल झाली. एका दिवसांत जवळपास तीन कोटींचा सराफ बाजारात व्यवहार झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
लातूर शहरातील साराफ बाजार धनत्रयोदशीच्या मुर्हूतावर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकामुळे बाजार फूलूला होता. धनत्रयोदशीच्या मुर्हूतावर ग्राहकांनी सोन्याचांदीचे दागीने खरेदी करण्यासाठी पसंती दिली. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लातूर बाजारपेठेची कोटयावधी रूपयांची उलाढाल झाली आहे. दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी शहरातील सराफ दुकानांत ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण सोने-चांदी खरेदी करुन घरी आणतात. या दागन्यिांची पूजा केली जाते.
यंदा अनेक कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस आणि वेळेवर वेतन मिळाल्याने निम्या ग्राहकांनी आधीच दिवाळीत दागिने खरेदी केली आहे. दिपावलीच्या सणामध्ये वसूबारस नंतर धनत्रयोदशीच्या दिवशीला महत्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरी आणि समृद्धीसाठी कुबेरासह लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या मुर्हुतावर नागरीकांनी बांगडया, अंगठी, गोल्ड, गळयातील हार आदी सोन्याचे दागीने खरेदी केले. धनत्रयोदशी दिवशी धनाची पूजा केली जाते. सोने हे धातू आहे. गतवर्षाप्रमाने यावर्षीही निर्बंधमुक्त दिवाळी असल्यामुळे नागरीक खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील पामांकित शॉपमध्ये सोन्याचे व हि-यांचे दागीने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. विविध डिजाईनचे तसेच राजस्थानी कलाकुसरीचे दागीने ग्राहकांचे खास आकर्षण ठरत आहेत. या दागीण्यांना ग्राहकांची चांगली मागणी मिळत असल्याचे व्यापारी अनिल अग्रवाल यांनी एकमतशी बोलताना सांगितले.