रामबन : जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बॅटरी चश्मा परिसराजवळ हा अपघात झाला. जम्मूहून श्रीनगरला जाणा-या लष्कराच्या ताफ्यातील ट्रक अनियंत्रीत होऊन ७०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत ३ जवानांचा मृत्यू झाला, तर इतर काही जखमी झाले आहेत.
लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले की, माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि जखमींना वाचवले. पण, यावेळी गाडीतीस तीन सैनिक जागीच मृतावस्थेत आढळले. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, लष्कराच्या वाहनाचा चक्काचूर झाला.
डिसेंबरमध्येही असाच अपघात
डिसेंबर २०२४ मध्येही जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथेही एक मोठा अपघात झाला होता. पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत ५ सैनिक ठार झाले आणि ५ जण गंभीर जखमी झाले होते.