24.2 C
Latur
Wednesday, January 29, 2025
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेश मंत्रिमंडळात ३० मंत्री करोडपती

मध्य प्रदेश मंत्रिमंडळात ३० मंत्री करोडपती

भोपाळ : मध्य प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर १२ दिवसांनी अखेर मोहन यादव मंत्रिमंडळाने शपथ घेतली. एकूण १८ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री, सहा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि चार राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय सुमारे ५७ वर्षे नऊ महिने असून ३० मंत्री करोडपती आहेत. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नवीन मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५७ वर्षे नऊ महिन्यांपेक्षा जास्त आहे.

मोहन यादव यांच्या नव्या मंत्रिमंडळात एकच मंत्री असा आहे जो करोडपती नाही. सारंगपूर राखीव जागेवरून विजयी झालेल्या गौतम टेटवाल यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण ८९.६४ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. टेटवाल हे मंत्रिमंडळातील सर्वात कमी मालमत्ता असलेले मंत्री आहेत. ते वगळता सर्व मंत्री करोडपती आहेत. रतलाम शहरातून विजयी झालेले चैतन्य कश्यप हे मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. कश्यप यांच्याकडे २९६.०८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. कश्यप हे मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारही आहेत.

मंत्रिमंडळाच्या सरासरी मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक मंत्र्याकडे सरासरी १८.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. १३ मंत्र्यांकडे १ ते ५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये धर्मेंद्र भावसिंग लोधी, नारायण सिंग कुशवाह, राकेश शुक्ला, एडल सिंग कंसाना, निर्मला भुरिया, दिलीप अहिरवार, करण सिंग वर्मा, नारायण सिंग पनवार, प्रद्युमन सिंग तोमर, राकेश सिंग, लखन पटेल, नागर सिंग चौहान आणि उपमुख्यमंत्री जगदीश सिंह यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR