21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeराष्ट्रीयदिवाळीत ४.४ लाख कोटी रुपयांचा किरकोळ व्यापार

दिवाळीत ४.४ लाख कोटी रुपयांचा किरकोळ व्यापार

नवी दिल्ली : यावेळी दिवाळीनिमित्त सर्वत्र बाजारात लोकांनी उत्साहाने खरेदी केली आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये यावेळी चांगलीच उलाढाल झाली आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’च्या म्हणण्यानुसार, यावेळी दिवाळीच्या काळात देशभरातील बाजारपेठांमध्ये चार लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला, जो एक विक्रम आहे. येत्या आठवड्यात हा व्यवसाय आणखी वाढण्याची शकुता आहे. ग्राहकांची भावनाही सकारात्मक दिसून येत आहे. एका अहवालानुसार, या वर्षी दिवाळीत ४.४ लाख कोटी रुपयांचा किरकोळ व्यापार झाला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी माध्यमांना सांगितले की, यंदाच्या दिवाळी मोसमात देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांहून अधिकचा विक्रमी व्यवसाय झाला आहे. या हंगामात ग्राहकांनी चांगली खरेदी केली. तसेच स्वीट्स’च्या व्यवसायाने या दिवाळीच्या मोसमात चांगला व्यवसाय केला आहे. यंदा मिठाईच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेचा परिणाम नफ्यावर झाला आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदाच चांगली विक्री
यावेळी दिवाळीत विक्री चांगली झाली. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच चांगली विक्री झाली आहे. कोरोनापूर्वी पेक्षा या दिवाळीत विक्री चांगली. “गोवर्धन पूजा, भैया दूज, छठ पूजा आणि तुलसी विवाह अजून बाकी आहेत. यामध्ये जवळपास ५० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR