28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरकार्तिकी यात्रेत मंदिर समितीस ४.७७ कोटीचे दान

कार्तिकी यात्रेत मंदिर समितीस ४.७७ कोटीचे दान

पंढरपूर / प्रतिनिधी
कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2023 यावर्षी कार्तिकी यात्रा गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी होती. या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस तसेच मानाचे वारकरी बबन विठोबा घुगे व सौ.वत्सला बबन घुगे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दि.14/11/2023 ते दि.27/11/2023 असा होता.

या यात्रेत मंदिर समितीस विविध माध्यमांतून रू.4,77,08,268/- इतकी देणगी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये श्रींच्या चरणावर रू.40,15,667/-, देणगी स्वरूपात रू.1,30,05,486/-, लाडूप्रसादातून रू. 62,49,000/-, भक्तनिवासातून रू.66,62,377/-, सोने-चांदी भेट वस्तूमधून रू.8,36,254/-, परिवार देवता व हुंडीपेटीतून रू.1,57,21,527/-, मोबाईल लॉकर व इतर जमेमधून रू.10,94,807/- इत्यादीचा समावेश आहे. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा रू.1,56,48,526/- इतकी उत्पन्नात वाढ झाली आहे.

याशिवाय, सुमारे 3 लाख 40 हजार 478 एवढ्या भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन व 5 लाख 71 हजार 220 एवढ्या भाविकांनी श्रींचे मुखदर्शन घेतले असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR