28 C
Latur
Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रपालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

पालखीमध्ये कंटेनर घुसून ४ वारकरी ठार

८ जण जखमी, नाशिक-पुणे मार्गावर दुर्घटना

अहमदनगर : प्रतिनिधी
शिर्डीहून आळंदीला जाणा-या पालखीत कंटेनर घुसल्याने चिरडून चार वारक-यांचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ब-याच जणांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक-पुणे महामार्गावर ही घडली. पायी चालणा-या वारक-यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारक-यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कंटेनरचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचे या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.

जखमींमध्ये बिजलाबाई शिरोळे (रा. वाळकी ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोरे (रा. माळी ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी सूर्य, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी ता. सिन्नर) यांचा समावेश आहे.

मृतांची नावे
-बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव)
-बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी)
-भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता)
-ताराबाई गंगाधर गमे (रा.को-हाळे, ता. राहता)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR