लातुर : प्रतिनीधी
लोखंड गल्ली कामदार रोड येथे केअर मेडिकल अँड ड्ट्रिरीब्यूटरर्स नावाच्या होलसेल मेडिकल दुकानाला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये औषधे व इंजक्शनचे जळून जवळपास ४० लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. मेडिकल अँड ड्ट्रिरीब्यूटरर्सचे मालक दुकान बंद करून घरी गेले होते. बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास दुकानाजवळील शेजा-यांनी दुकानाला आग लागली असल्याचे मिडिकलचे सुधीर माने यांना कळवले. माने त्वरीत दुकानी येवून शेजा-यांच्या सहाय्याने पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र तोपर्यंत या आगीत दुकानातील ब्लू स्टार कंपनीचे फ्रिजर आणि विविध कंपन्यांच्या औषधांच्या इंजेक्शनसह इतर साहित्य जळून खाक झाले होते. ब्लू स्टार कंपनीचे फ्रिजर अंदाजे किंमत ३० हजार रुपये व रिलासन्स लाइफ सायन्सेय, अॅबाट इंडीया लिमिटेड, जी. एस. के. समर्थ फार्मा, इन्टास इंडीया लिमिटेड, नोव्हो फार्मा आणि इतर विविध कंपन्यांच्या इंजेक्शन आणि इतर साहित्य असे एकूण ४० लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सुधीर माने यांनी सांगितले. या घटनेत कोणत्याही प्रकरची जिवीत हाणी झाली नाही. लातूर शहरात आग लागण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकाची काळजीपूर्वक दक्षता घेणे गरजेचे आहे.