मुंबई : प्रतिनिधी
राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या तब्बल चौदा जिल्ह्यातील ७८४ गावे आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवण्याची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला गावक-यांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी २२३ टँकर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्यास सुरवात झाली आहे. राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाण्याचा साठाही झपाट्याने खालावत आहे. सध्याच्या घडीला या सर्व धरणातील पाणीसाठा फक्त ४२.८६ टक्क्यांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला तेव्हा राज्यातल्या चौदा जिल्ह्यातील १७८ गावे व ६०६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. या गावक-यांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी खासगी २०७ आणि सोळा शासकीय टँकर धावत असल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्वाधिक टँकर पुण्यात
सध्या सर्वाधिक म्हणजे पुण्यात ६५ टँकर धावत आहेत त्याखालोखाल साता-याता ४० टँकर गावागावात पाणी पुरवठा करीत आहेत. मागील आठवड्यात राज्यात १७८ टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी धावत होते पण आता हा आकडा वाढला असून सध्याच्या घडीला २२३ टँकर पाणी पुरवठा करीत आहे.
धरणातील पाणीसाठा
– नागपूर-४२.८३ टक्के, अमरावती-५१.०३ टक्के, संभाजीनर४२.३८ टक्के, नाशिक ४४.८४ टक्के, पुणे- ३८.४२ टक्के, कोकण- ५०.६८ टक्के
जिल्हा आणि टँकरची संख्या
ठाणे – ३०
पालघर – १६
संभाजीनगर – १७
अमरावती -१२
बुलडाणा – २२