31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसच्या दुस-या यादीत ४३ उमेदवार

कॉंग्रेसच्या दुस-या यादीत ४३ उमेदवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली. आसाम, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानधील उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. कॉंग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी ही नावे वाचून दाखवली. काँग्रेसच्या दुस-या यादीत ४३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई हे आसामच्या जोरहतमधून लढणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून निवडणूक लढतील. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या राहुल कास्वा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून संधी देण्यात आली. वैभव गेहलोत हे जलोरेतून निवडणूक लढवणार आहेत. दुस-या यादीत एकूण ४३ उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील १० खुल्या प्रवर्गातील, १३ ओबीसी उमेदवार, १० एससी उमेदवार, ९ एसटी उमेदवार तर एका मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे.

काँग्रेसकडून ५ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील उमेदवाराची नावे जारी करण्यात आली आहेत.
महाराष्ट्राबाबतचा सस्पेंस कायम आहे. राज्यात महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तुर्तास आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील आणि दमन आणि दिव केंद्र शासित प्रदेशातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR