पुणे : महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अनेक ठिकाणी मताच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप दोन्हीकडच्या पक्षांकडून केला जात आहे. त्यातच शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हीडीओ शेअर केला आहे.
अमोल कोल्हे यांनी व्हीडीओ शेअर केला असून मताच्या बदल्यात मतदारांना पैसे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाकरवाडी (शिरोली, खेड) येथील हा व्हीडीओ असल्याचे कोल्हे म्हणाले आहेत. ५०० रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचे काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही! अमोल कोल्हे व्हीडीओ शेअर करत म्हणालेत की, ५०० रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचे काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही! असो, मायबाप जनता सुज्ञ आहे.