25.4 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण, २ हजार ७२८ कोविड चाचण्या

राज्यात कोरोनाचे नवीन ६१ रुग्ण, २ हजार ७२८ कोविड चाचण्या

मुंबईः राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले असून ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.१७ टक्के इतकं आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.

सोमवारी राज्यामध्ये कोरोनाच्या २ हजार ७२८ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या १ हजार ४२३ इतक्या झाल्या तर आरएटी चाचण्या १ हजार ३०५ झाल्या. राज्यात सोमवारचा पॉझिटिव्हीटी दर २.२३ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहतीनुसार, सध्या राज्यामध्ये जेएन.१ व्हेरिएंटचे २५० रुग्ण आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक १५० रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली आणि ठाणे प्रत्येकी ७ रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यात कमी प्रमाणात रुग्णसंख्या आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR